आता तुम्हीदेखील सरकारी अधिकारी बनणारच... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. 

पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. 

उपजिल्हाधिकारी पदापासून सरळसेवा भरतीपर्यंतच्या परीक्षा देऊन सरकारी सेवेची स्वप्ने पाहणाऱ्या राज्यभरातल्या ग्रामीण, निमशहरी व शहरी भागातील उमेदवार, गृहिणींना "सकाळ विद्या' आणि "शिवनेरी फाउंडेशन' एक अभिनव डिजिटल तंत्र पुरवणार आहे. या तंत्राच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब अथवा संगणकाच्या माध्यमातून अगदी सहजसोप्या पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा परिपूर्ण अभ्यास करता येणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून "शिवनेरी फाउंडेशन'ने केलेल्या सर्वेक्षणातून व राज्य लोकसेवा आयोगाशी जवळून परिचित असणाऱ्या तज्ज्ञांच्या अभ्यासातून, आयोगाच्या परीक्षांनुसार अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा एकत्रित अभ्यास असणारे डिजिटल तंत्र साकारले आहे. परीक्षानिहाय 200 तासांपर्यंतचा परिपूर्ण अभ्यास या डिजिटल तंत्रात उपलब्ध करण्यात आला आहे. 

इच्छा, जिद्द, कष्ट करण्याची तयारी असूनही ध्येय गाठता येत नसल्याने स्पर्धा परीक्षेत हजारो उमेदवार अपयशी ठरतात. अगदी पाच ते सात वर्षे अभ्यास करूनही अनेकांना अपयश येते. या अपयशामागील कारणे जाणून घेत "शिवनेरी फाउंडेशन'ने हा डिजिटल अभ्यासक्रम तयार केला आहे. एखाद्या ऍकॅडमीमध्ये जाऊन अभ्यास करण्याची परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील या तंत्राचा फायदा होणार आहे. आपले काम सांभाळून स्पर्धा परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करू इच्छिणाऱ्या गृहिणी व नोकरदारांसाठीही हे तंत्र महत्त्वाचे ठरणार आहे. 

पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षापासून अभ्यास सुरू करणाऱ्यांसाठी हा मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही. संपूर्ण अभ्यासक्रमाची व्हिडिओ लेक्‍चर्स, यशाकडे नेणाऱ्या परिपूर्ण नोट्‌स, चालू घडामोडींसाठी वैयक्तिकरीत्या उमेदवाराच्या व्हॉट्‌सऍप अथवा ई-मेलवर सातत्याने होणारे मार्गदर्शन, तसेच यामध्ये सहभागी होणाऱ्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक पातळीवर हे डिजिटल तंत्र उमेदवारांना मार्गदर्शक व मदतीचे ठरणार आहे. 

नोंदणी व इतर माहितीसाठी संपर्क 
राज्यसेवा परीक्षा लवकरच होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अभ्यास वेळेत पूर्ण व्हावा यासाठी गुरुवारपासून (ता. 7) हे डिजिटल तंत्र राज्यभरातल्या "सकाळ' कार्यालयांमध्ये उपलब्ध होईल. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क ः 7350001617 (सकाळी 10 ते सायंकाळी 6 - रविवार सोडून). 

हे तंत्र मोबाईल फोन आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन्ही साधनांसाठी वापरता येईल. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते उपलब्ध असेल. अर्थात, एका मोबाईललाच त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध असेल. 

या उच्च गुणवत्तेच्या तंत्राची झलक येथेही पाहता येईल. 
(यू ट्यूबवर शिवनेरी ऍकॅडमीचा चॅनेल आहे.) https://www.youtube.com/channel/UCcUoYZmI4VkhuGAHKErLo8Q/videos 
या लिंकवर या अभ्यासक्रमाच्या व्हिडिओ लेक्‍चर्सचे नमुने पाहायला मिळतील. 

या परीक्षांसाठी डिजिटल तंत्र उपलब्ध 
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 व पेपर 2 (सर्व विषय) 
पीएसआय, एसटीआय, एएसओ परीक्षा (सर्व विषय) 

खालील परीक्षांच्या अभ्यासासाठी नोंदणी सुरू 
- पीएसआय, एसटीआय, एएसओ मुख्य परीक्षा (मराठी व इंग्रजी व्याकरण) 
- तलाठी परीक्षा (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण) 
- टॅक्‍स असिस्टंट (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण) 
- खात्यांतर्गत फौजदार परीक्षा (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण) 
- लिपिक (क्‍लेरिकल) परीक्षा (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी - इंग्रजी व्याकरण) 
- पोलिस भरती (बुद्धिमापन - अंकगणित - मराठी) 

Web Title: pune news Government officer Shivneri Digital