ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात पक्षांत चुरस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 3 हजार 666 ग्रामपंचायतीची मतमोजणी आज झाली. पुणे जिल्ह्यातील 218 पैकी 111 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता प्रस्थापित केली, तर कॉंग्रेसकडे 29, शिवसेनेकडे 17 आणि भाजपला 11 ग्रामपंचायती मिळाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखले. त्यांनी 238 ग्रामपंचायतीवर दावा केला असला, तरी जवळपास 153 ठिकाणी त्यांचे सरपंच बसले. 

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 666 ग्रामपंचायतीसाठी सरासरी 81 टक्के मतदान झाले होते. किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीचे वेध लागले होते. दुपारनंतर निकाल हाती येऊ लागले तेव्हा विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. अनेक ठिकाणी आजच दिवाळी साजरी झाली. यंदा प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडण्यात आला आहे. यामुळे अनेक गावात सरपंच एका पक्षाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बहुमत मात्र अन्य पक्षांकडे अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. 

सांगली जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तुलनेत चांगली कामगिरी करत भाजप विस्ताराला ब्रेक लावला. भाजपने थेट सरपंच निवडीत मात्र दमदार कामगिरी नोंदवत गावपातळीवर आपले गट मजबूत केले. शिवसेनासमर्थक म्हणून तब्बल 32 ठिकाणी भगवा फडकला. अमरावती जिल्ह्यातील 250 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कॉंग्रेसला सर्वाधिक 134 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील 341 ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थित उमेदवारांनाच पसंती मिळाली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दत्तक गाव कनेरी येथे पराभव पत्करावा लागला. भंडारा जिल्ह्यात 362 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपला 184 ठिकाणी विजय मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यात 52 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसमध्ये चुरस दिसून आली. भाजपने 21, तर कॉंग्रेस 19, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी 2 अपक्षांनी 8 ग्रामपंचायतीवर कब्जा मिळविला. 

तरंगफळच्या सरपंचपदी तृतीयपंथी 
माळशिरस (जि. सोलापूर) : तरंगफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानू शंकर कांबळे या तृतीयपंथी उमेदवाराने आपल्या सहा प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत थेट जनतेतून सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. राज्यात आपण सरपंचपादची निवडणूक जिंकू शकतो, असे उदाहरण घालून दिले आहे. 

Web Title: pune news gram panchayat election result