पुढची पिढी जीवघेण्या प्रदूषणाच्या विळख्यात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे - ‘शहरातील मुले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रदूषणाला सामोरी जात असतात. या मुलांमध्ये श्‍वसनाचे विकार वाढत असल्याचे दिसून येते’, असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी नोंदविले. 

हवेच्या प्रदूषणामुळे गेल्या पाच वर्षांत लहान मुलांमध्ये श्‍वास घेण्याची क्षमता कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याचेही डॉ. जोग यांनी सांगितले.

या संदर्भात नवजात अर्भकतज्ज्ञ डॉ. संदीप कदम म्हणाले, ‘नवजात अर्भकांमध्ये वजन आणि प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्या फुफ्फुसांची पूर्ण वाढ झालेली नसते. प्रदूषणामुळे नवजात अर्भकांना सर्दी, ॲलर्जीचा त्रास 
होऊ शकतो.’ 

एका बाजूला कमी वजनाच्या मुलांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे; पण दुसरीकडे या जीवदान मिळालेल्या बाळांना स्वच्छ हवा मिळत नाही. त्यातून गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.

लहान मुलांना प्रदूषणापासून वाचवणार कसे?
लहान मुलांना प्रदूषणापासून वाचविण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर आहे. मुलांचे आरोग्य चांगले राहावे आणि प्रदूषणाचा फार त्रास होऊ नये, म्हणून तुम्ही काही ना काही उपाय करत असालच! मग हे उपाय ‘सकाळ’ला सांगा आणि इतरांनाही कळू द्या! लिहून पाठवा तुमचे अनुभव, तुम्ही करत असलेले उपाय webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर किंवा #GreenPune हॅशटॅग फेसबूक आणि ट्विटरवर वापरा आणि नोंदवा कारणे, सुचवा उपाय!

Web Title: pune news greenpune next generation pollution