तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ः बाजार समितीच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ः बाजार समितीच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.

महात्मा फुले यांना तळेगावात अभिवादन

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): "महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांची शिदोरी सध्याच्या पिढीलाही उपयोगी आहे. त्यांनी केलेले विविध क्षेत्रांतील काम अखंडित चालू ठेवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी केले.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महात्मा फुले उपबाजारात फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरके बोलत होते. येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, माजी उपसभापती अनिल भुजबळ,
मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी फुले यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले.

पांडुरंग राऊत, बाळासाहेब भुजबळ, आरती भुजबळ, गणेश तोडकर, रमेश भुजबळ, संदीप ढमढेरे, संभाजी ढमढेरे, महेंद्र पिंगळे, संभाजी भुजबळ, सोमनाथ भुजबळ, विद्या भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

बाजार समिती, महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान, महात्मा फुले समता परिषद, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यातर्फे फुले यांना अभिवादन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com