जीएसटी कमी होऊनही जुन्याच दराने विक्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे - केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केल्यानंतरही काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वस्तूंच्या दरात कपात केली नाही. 15 नोव्हेंबरपूर्वीच्याच दराने विक्री सुरू असल्याचा आरोप ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत जीएसटी विभागाकडे तक्रार केल्याचे त्यांनी नमूद केले. 

जून महिन्यापासून देशात जीएसटी लागू झाला. ही करपद्धती लागू करताना केंद्राने काही वस्तूंवर 28 टक्के जीएसटी लागू केला होता. सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे जीएसटी परिषदेने या करात कपात करून काही वस्तूंवरील कर 28 वरून 18 टक्के केला आहे. हा निर्णय नोव्हेंबर महिन्यात केंद्राने घेतला. त्यानुसार या वस्तूंवर 18 टक्केच जीएसटी लावून त्यांची विक्री होणे गरजेचे होते. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मात्र नोव्हेंबरपूर्वीचीच किंमत कायम ठेवली आहे. उत्पादनाच्या मूळ किमतीमध्ये वाढ केली आहे. यामुळे करात कपात होऊनही ग्राहकांना नोव्हेंबरपूर्वीच्याच भावात या वस्तू खरेदी कराव्या लागत असल्याचे पाठक यांनी सांगितले. 

या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक पेठेने सर्व प्रकारची पडताळणी केली. या कंपन्यांनी नोव्हेंबरपूर्वी दिलेली जाहिरात आणि त्यानंतर दिलेली जाहिरात या दोन्हींमध्ये वस्तूची किंमत एकच आहे. ही ग्राहकांची लूट असून, या संदर्भात जीएसटीच्या पुणे विभागाकडे तक्रार केली आहे. वरिष्ठांकडे ही तक्रार पाठविण्यात येईल, असे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले आहे. या वेळी पाठक यांनी काही कंपन्यांची उत्पादनेच दाखविली. 

Web Title: pune news GST Suryakant Pathak