पंधरा लाखांचा गुटखा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे - शहरात पुन्हा एकदा गुटखा विक्रीने डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परराज्यातून पुण्यात गुटखा विक्रीसाठी येत असल्याचे निरीक्षण अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) नोंदविले आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत वेगवेगळ्या तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून 15 लाख 20 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 

कर्नाटकातून मोटारीने पुण्यात विक्रीसाठी येणारा दीड लाख रुपयांचा गुटखा "एफडीए'ने जप्त केला. त्यात मोटारही जप्त केल्याची माहिती "एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. ते म्हणाले, ""चतुःशृंगी मंदिराच्या परिसरात विक्रीसाठी आणलेला आठ लाख 31 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. तसेच, लोणी काळभोर येथूनही दीड लाख रुपयांचा गुटखा मिळाला आहे. त्या वेळी कोंढव्यातील गोकुळनगर येथील गोदामात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर गोदामावर सोमवारी मध्यरात्री छापा टाकण्यात आला. त्यातून पाच लाख 39 हजार 880 रुपयांचा गुटखा जप्त केला.'' राज्यात 12 जुलै 2012 रोजी गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली आहे. तेव्हापासून आतापर्यंत पुणे विभागात 23 कोटी 12 लाख 99 हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुणे विभागातील गुटख्याची कारवाई 
- फिर्याद दाखल ः 819 
- अटक केलेले आरोपी ः 981 
- खटले दाखल ः 1282 
- खटले प्रलंबित ः 135 
- पोलिसांनी दाखल केलेले खटले ः 519 

Web Title: pune news gutkha