पुणेः आमदाराच्या कार्यालयावर टाकला कचरा

संदीप जगदाळे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ नागरिकांनी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयावर संतप्त सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी कचरा टाकला. तसेच मुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री आणि महापौरांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ नागरिकांनी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयावर संतप्त सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी कचरा टाकला. तसेच मुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री आणि महापौरांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी नगरसेवक दत्तोबा ससाणे, सुनिल बनकर, सागरराजे भोसले, संजय शिंदे, मुकेश वाडकर, अॅड. के. टी. आरू यांच्यासह भाजपा वगळता अन्य पक्षाचे मतदार संघातील नगरसेवक व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

बाबर म्हणाले, 'माजी आमदार आमदार योगेश टिळेकरांना लोकांनी निवडून दिले आहे. मात्र, आमदार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणा-या कचरा प्रकल्पाबाबत बोलत नाहीत. या प्रकल्पातून दुर्गंधी आल्यास एक महिन्यात प्रकल्पाला टाळा ठोकू असे विधान करतात. आता हडपसरची सुज्ञ जनता येथे प्रकल्प तर होवूच देणारच नाही, मात्र जनताच टिळेकरांनाच टाळा ठोकून धडा शिकवेल.'

शिवरकर म्हणाले, 'सर्व पक्षीय मतभेद सोडून आम्ही भाजपा व आमदारांना धडा शिकवू. पिंपरी सांडसला होणारा प्रकल्प रद्द करून आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. या भागात अगोदरच पाच कचरा प्रकल्प आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आम्हाला विकास कामे मारणार आमदार हवा. पुर्ण शहराचा कचरा आमच्या माथी मारणारा नको.

ससाणे म्हणाले, 'आमदारांनी टिळेकर हे नाव बदलून कचराकर असे अडनाव बदलावे. आता केवळ कचरा बहाद्दर आमदाराच्या कार्यालयावर कचरा फेकून त्यांचा निषेध केला आहे. कचरा प्रकल्प रद्द न झाल्यास आम्ही आमदारांना कोंढव्यात राहू देणार नाही, तसेच मतदार संघात फिरू देणार नाही. हडपसर ला कचरा नगरी करणा-यांना मुख्यमंत्री व पालकमंत्री आणि महापौरांनी कचरा प्रकल्प परिसरात घर बांधावे, म्हणजे त्यांना जनतेच्या वेदना समजतील.'

Web Title: pune news hadapsar mla yogesh tilekar home garbage