विनयभंग करणाऱ्यास महिलेने दिला चोप

संदीप जगदाळे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

हा प्रकार लक्षात आल्यावर इतर नागरिकही त्या महिलेच्या मदतीला आले आणि त्यांनी रूपेशसह त्याच्या साथीदारांबाबत तक्रारी केल्या. धमक्या देणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार ते करत असल्याचे सांगितले. 

हडपसर : विनयभंग करणा-या ट्रॅव्हल एजंटला महिलेने बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना सोलापूर महामार्गावर रवीदर्शन येथे घडली. रूपेश ज्ञानोबा गव्हाणे( रा. हडपसर) असे या एजंटचे नाव आहे. संबधित महिलेने यासंर्दभात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महिला मगरपट्टा येथे राहत असून, ती सोलापूर येथे जात होती. त्यावेळे गव्हाणे याने महिलेशी अश्लील वकतव्य करत विनयभंग केला. त्यावेळी तिने त्याच्या कानाखाली लगावली आणि चोप देतच पोलिस ठाण्यात त्याला नेले व फिर्याद दिली. हा प्रकार लक्षात आल्यावर इतर नागरिकही त्या महिलेच्या मदतीला आले आणि त्यांनी रूपेशसह त्याच्या साथीदारांबाबत तक्रारी केल्या. धमक्या देणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार ते करत असल्याचे सांगितले. 

संबधित महिलेने पोलिसात तक्रार करू नये यासाठी ट्रॅव्ह व्यवसायातील साथीदारांनी महिलेलाही दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पुढील तपास महिला उपनिरिक्षक एम. आर. निकम करीत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news hadapsar molested woman hits back