हडपसरमधील प्रेमप्रकरणाला मिळाले नवीन वळण

संदीप जगदाळे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

हडपसर (पुणे): अजीत आत्माराम इंगळे (रा. 25 मंगळवार पेठ, फलटण) या तरूणाने प्रेमप्रकरणातून स्वतःच्या मारूती मोटारीला आग लावून स्वतःला जाळून घेवून आत्महत्या केल्याचा गुन्हा ह़डपसर पोलिस ठाण्यात दाखल होता. मात्र, याप्रकरणी लष्कर न्यायालयाने मयताचा भावाची बाजू ऐकूण घेतल्यानंतर हडपसर पोलिसांना प्रेयसी व तिच्या नातेवाईकांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एप्रिल 2016 मध्ये हडपसरमधील सातववाडी येथे ही घटना घडली होती.

मयत अजीत याचा भाउ रोहित आत्माराम इंगळे (वय 26) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अजितच्या प्रेयसीच्या आईने प्रियेसी आत्महत्या करत आहे, असा बहाणा करून अजित याला फोन केला. तातडीने अजित फलटण येथून हडपसर येथील प्रेयसीच्या माहेरी आला. त्यानंतर प्रेयसी व तिच्या नातेवाईकांनी प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने या रागातून प्रेयसी व तिच्या नातेवाईकांनी संगणमताने अजितचा घातपात करून त्याला ठार मारले आणि त्याच्याच मारूती मोटारीत बसवून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पेटवून दिले. नंतर मोटार पेटून अजितचा जळून मृत्यू झाल्याचा बनाव केला.

अजीत याची प्रेयसी अजीतच्या नात्यातीलच आहे. मात्र, एकतर्फी प्रेमातूनच अजित प्रेयसीला वांरवार फोन करून त्रास देत होता. प्रेयसीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने स्वतःची गाडी पेटवून स्वतःला जाळून घेवून अत्महत्या केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. मात्र, न्यायलयाच्या आदेशानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Web Title: pune news hadapsar A new turn is found in love