घरफोडी व वाहनचोरीतील आरोपींना हडपसरमध्ये अटक

घरफोडी व वाहनचोरीतील आरोपींना हडपसरमध्ये अटक

संदीप जगदाळे
रविवार, 4 जून 2017

गोपनीय माहितीच्या आधारे विधि संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेल्या एकूण ३ मोटार सायकली व येरवडा परिसरातून चोरलेले एक चारचाकी वाहन तसेच हडपसर परिसरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच घरफोडीतील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार हस्तगत करण्यात आली. 

हडपसर : घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलिसांनी एका विधि संघर्षग्रस्त बालकासह अन्य दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ घरफोडया उघडकीस आल्या आहेत. सोन्याचे दागीने व ८ वाहने आणि तीन तोळे सोने व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कृष्णानंद नाईक (वय २९, काळेपडळ, हडपसर) यांची हीरो होंडा पॅशन प्लस मोटरसायकल मगरपट्टा सिटी येथून 'पे अॅण्ड पार्क'मधून चोरीला गेली होती. पोलिस शिपाई अमित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अक्षय पोपटराव पांडूळे (वय २२, वडकीनाला, ता. हवेली, जी. पुणे) व गणेश अभिमान जावळे (वय २३, रा. वैदवाडी, हडपसर) यांना ताब्यात घेऊन नाईक यांच्या गाडीसह अन्य चोरीच्या तीन गाडया अशा एकूण चार मोटारसायकली जप्त केल्या.

तसेच दुसऱ्या गुन्हयात नजीर गुलाम शेख (वय ४९, रा. हिंगणेमळा, हडपसर) यांनी राहत्या घरासमोर त्यांची होंडा शाईन मोटार सायकल पार्क केली होती. या गुन्ह्याततपास करत असताना अमित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विधि संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेल्या एकूण ३ मोटार सायकली व येरवडा परिसरातून चोरलेले एक चारचाकी वाहन तसेच हडपसर परिसरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच घरफोडीतील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार हस्तगत करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक विष्णू पवार व अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, हेमंत पाटील, हवालदार राजेश नवले, युसुफ पठाण, सैदोबा भोजराव, राजू वेंगरे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, गणेश दळवी, नितीन मुंढे, अकबर शेख, दाउद सय्यद यांच्या पथकाने वरील कामगिरी केली. 

Web Title: pune news hadapsar police nab three robbers vehicles