हॅंडमेड आणि स्वदेशी वस्तू खरेदीला पसंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणानिमित्त एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांची पसंती विचारात घेऊन सुंदर, आकर्षक व उपयोगी वस्तू सध्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. हॅंडमेड वस्तूंमध्ये पेशवाई, करंजी, लोटस, किस्टल्स, चमकी, गोल्डन आणि पतंगाचा कागद वापरून बनविलेले कंदील, विविध प्रकारचे तोरण, पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या, सुगंधी मेणबत्त्या यांकडे ग्राहकांची मागणी वाढत आहे.

ज्यूट, करंज्या, कमळ अशा पारंपरिक ढाच्यातून बनवलेले आकर्षक कंदील, कलाकुसर केलेले राजस्थानी दिवे, विजेवर चालणाऱ्या समया मुख्य आकर्षण ठरत आहेत. ॲक्रॅलिकमधील समया लांबून पाहिल्यास पितळेच्याच वाटतात. त्यातही तीन ते सहा मजली समया उपलब्ध आहेत. त्यांवरील कोरीव काम लक्षवेधी आहे. छोटे कारंजे, शंख-शिंपल्यांपासून केलेल्या वस्तूही वेधक ठरतात.

भारतीय आकाश कंदील ६० ते ९०० रु.
सुगंधी पणत्या ३० ते  १५० रुपयांपर्यंत
तोरण १०० ते  १२०० रुपयांपर्यंत 

दुकानात चिनी वस्तू नाहीत, याची खात्री करूनच ग्राहक दुकानात येत आहेत. भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. हस्तकलेतून तयार केलेल्या पणत्या, कंदील, तोरण यांना अधिक मागणी आहे. तुलनेने चिनी वस्तू स्वस्त असल्या तरी टिकाऊ नसतात. यंदा जीएसटी लागू झाल्यामुळे किमती वाढल्या आहेत. भारतीय वस्तू खरेदी केल्यामुळे पारंपरिक हस्त उद्योगांमध्ये रोजगार मिळत आहे.
- राकेश अगरवाल, विक्रेते

आम्ही मागील वर्षापासून चिनी वस्तू खरेदी करणं बंद केलं आहे. यंदा भारतीय वस्तू खरेदी केल्या आहेत. भारतीय वस्तू खरेदी करून यापुढचे पारंपरिक सण साजरे करणार आहोत.
- अजय भोसले, ग्राहक

Web Title: pune news handmade & indian goods purchasing