देशासाठी पटेलांचे योगदान महत्वाचे- आयुक्त हर्डीकर

ज्ञानेश्वर भंडारे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वाल्हेकरवाडी येथे एकता दौडचे आयोजन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले होते.

वाल्हेकरवाडी : सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाबद्लचे योगदान युवा पिढीला माहीत व्हावे व जी एकात्मता त्यांनी जोडली. ती आपण एकसंध ठेवूया त्यांचे असणारे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे श्रावण हर्डीकर यांनी आज चिंचवड येथे एकता दौडला संबोधित करतांना केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वाल्हेकरवाडी येथे एकता दौडचे आयोजन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले होते. यामध्ये १००० तरुण-तरुणी, महिला व जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी गटनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, अड.मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, स्वच्छता दूत चंद्रकांत कुलकर्णी, अनुप मोरे, नामदेव ढाके, महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाचे मनोज लोणकर, शिक्षण मंडळाचे आवारी उपस्थित होते.   

एकता दौडची चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी इथून सुरुवात होऊन ते भेल चौक प्राधिकरण येथे सांगता झाली. सरदार वल्लभभाई पटेल युवा प्रतिष्ठान, समता भातृ मंडळ, गुजर स्नेहवर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, लेवा पाटीदार संघ, लेवा महिला शक्ती संघ,आदी संघटनांनी या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी योगदान दिले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोचावेत व नवतरुणांना त्यांच्या विचारांचा फायदा व्हावा यासाठी या दौडचे आयोजन केल्याचे नामदेव ढाके यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

    Web Title: pune news haveli sardar patel ekta daud ias hardikar