पुणेः प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवताप रूग्ण तपासणी

युनूस तांबोळी
शुक्रवार, 21 जुलै 2017

गेल्या वर्षी अचानक उदभवलेल्या तापाने दोन लहान मुलांचा बळी गेला होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत. यासाठी नागरीकांनी परीसर स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. या भागातील अस्वच्छतेचा परीणाम परीसरातील गावांवर होत असतो.
- डॅा. सुभाष पोकळे पंचायत समिती सदस्य शिरूर

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिंदेवाडी (ता. शिरूर) परीसरात पुन्हा हिवतापाचे रूग्ण आढळून आले आहेत. या भागातील अस्वच्छता पहाता पुन्हा आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवतापाचे रूग्ण तपासणीसाठी येऊ लागले आहेत. यासाठी आरोग्य विभागाने विशेष तपासण्या सुरू करणे अपेक्षीत आहे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुक्यातील मलठण पासून तीन किलोमिटर अंतरावर शिंदेवाडी ही वस्ती आहे. मागील वर्षी येथे उवांपासून फैलवणारा एपिडेमिक टायफस या आजाराचे देशातिल पहिले संशयीत रूग्ण सापडले होते. या दुर्मिळ आजाराचे लक्षण असणाऱ्या सहा लहान मुलांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी या आजाराने दोन लहान  मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या काळात शिंदेवाडी परीसरात नियमितपणे आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली होती. ताप आलेल्या लहान मुलांचे डेंगी, हिवताप, स्वाइन फ्लू, चिकनगुऩ्या, लेप्टोस्पायरोसीस याची तपासणी करण्याची स्वतंत्र यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. त्यावेळी येथील परीसर स्वच्छ करून येथील आजार आटोक्यात आणला होता. त्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाले आहेत. सध्या शिंदेवाडी परीसरात पावसाळी वातावरणामुळे असवच्छता पसरली आहे. नागरीकांनी पुन्हा घराजवळ उर्किडे जमा केले आहेत. त्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. या भागातून पुन्हा हिवतापाचे रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. या भागात त्वरीत नागरीकांची आरोग्य तपासणी करून घेण्यात याव्यात अशी मागणी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड यांनी केली आहे.

या परीसरात हिवतापाचे रूग्ण वाढत असल्याची माहीती मिळताच कर्डे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यु. एस. बाभुळगावकर व कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या 66 विद्यार्थ्यांची तपासणी करून तातडीने औषधे देण्यात आले. यावेळी औषध निर्माता अधिकारी एस, एम. झावरे, बी. आर. वाळके, मुख्यध्यापक लक्ष्मण जगताप, संभाजी डावखर, दत्तात्रेय चोरे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. प्राथमिक आरोग्य कर्मचारी यांनी या परीसरात पहाणी करून पाण्याच्या भांड्याची तपासणी केली. साचलेले पाणी ओतून देऊन परीसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

या भागात पावसाळी वातावरणात बदल झाला असून अस्वच्छतेमुळे आजाराचा उदभव होऊ शकतो. यासाठी परीसरात स्वच्छता ठेवणे अपेक्षीत आहे. कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. घराजवळ उर्किडा करू नये. मागील वर्षी येथे हिवतापाची साथ आली होती. त्यातून एपिडेमिक टायफस या आजाराचे देशातिल पहिले संशयीत रूग्ण सापडले होते. सध्या या भागात हिवतापाचे रुग्ण वाढल्याने येथील नागरीकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी यु. एस. बाभुळगावकर यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: pune news health cheaking in shirur taluka