दातार फार्मची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली 

दातार फार्मची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली 

पुणे - मुठा नदीपात्रात बेकायदा टाकलेल्या कृत्रिम भरावप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका नुकतीच फेटाळली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात दातार फार्म यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. 

दातार फार्मने नदीपात्रात अनधिकृतपणे भराव टाकल्याप्रकरणी पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर, दिलीप मोहिते, संजय भोसले आणि नरेंद्र चुग यांनी सुरवातीला दिल्लीतील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांनी पुन्हा काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाकडे दाद मागणारी याचिका दाखल केली. यावर झालेल्या सुनावणीत नदीपात्रात अनधिकृत भराव टाकल्यामुळे नदीची वहनक्षमता घटत असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने न्यायाधिकरणात सादर केला होता. यावर दातार फार्मने महिन्याभरात नदीपात्रातील राडारोडा पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली काढावा, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले होते. मात्र, आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी दातार फार्मने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली असल्याची माहिती यादवाडकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com