नदीपात्रातील 23 होर्डिंग्जवर कुऱ्हाड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे  -नदीपात्रातील जाहिरात फलक (होर्डिंग) काढताना महापालिका प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याची तक्रार होर्डिंग व्यावसायिकांकडून होत आहे. शहरातील इतर व्यावसायिकांची होर्डिंग्ज काढत असताना भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याशी संबंधित होर्डिंग काढताना महापालिकेने "हात आखडता' घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, नियमाप्रमाणे कारवाई होत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

नदीपात्रातील होर्डिंग्ज काढून टाकावीत, अशी मागणी भाजपच्या एका नगरसेवकाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. महाजन यांनी अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेला दोन दिवसांपासून पत्र पाठवून अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची सूचना केली. महापालिकेने नदीपात्रातील सर्वच होर्डिंग्ज काढण्यास सुरवात केली. राजाराम पूल ते खराडी दरम्यानची 13 होर्डिंग्ज सोमवारी काढली. मंगळवारीही 10 होर्डिंग्ज काढण्यात आली. मात्र, बंडगार्डन पुलाजवळील एक होर्डिंग प्रशासन काढत असताना महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कारवाई थांबविण्याचा आदेश दिला. त्यामुळे ज्या व्यावसायिकांची होर्डिंग्ज काढण्यात आली, ते संतप्त झाले. "नदीपात्रातील होर्डिंग्ज काढायची असतील तर, सर्वांचीच काढावी,' अशी मागणी त्यांनी केली. याबाबत महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही त्यांनी संपर्क साधला. 

याबाबत न्यायालयात दावा दाखल असून, विधी विभागाच्या सूचनांनुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने सांगितले. 

पुरावे दाखविले तरीही कारवाई 
काढण्यात आलेल्या होर्डिंग्जपैकी 12 अधिकृत असून, महापालिकेने 30 सप्टेंबरपर्यंतचे त्याचे शुल्कही वसूल केले आहे. त्याचे पुरावेही व्यावसायिकांनी दाखविले तरीही होर्डिंग्ज काढली. मात्र, भाजपच्या मंत्र्याशी संबंधित अधिकाऱ्याचे नदीपात्रातील होर्डिंग्ज "बीओटी' (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावरील आहे, असे सांगत त्यावरील कारवाई टाळली, असा त्यांचा आरोप आहे. 

Web Title: pune news hoarding