
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कात्रज बोगदा सहा तास राहणार बंद
पुणे - कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद राहणार आहे. १८ मार्च 2023 रोजी रात्री ११ वाजल्यापासून १९ मार्च पहाटे २ पर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. शिवाय २३ मार्च 2023 रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २४ मार्च पहाटे २ पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान सातऱ्याकडे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. मात्र वाहतूक बंद असलेल्या काळात जुना कात्रज बोगदा मार्ग, कात्रज चौक, नवले पूल विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्याने मुंबई रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. व्हीएमएस आणि व्हीसीडी सिस्टम्स बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
व्हीएमएस आणि व्हीसीडी सिस्टम्स बसविण्याचे काम झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची, तसेच मुंबईकडन साताऱ्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असेल.