पुणे: मदरशामध्ये दुमदुमला भारतमातेचा जयघोष

मिलिंद संधान
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

मदिना मशिद आणि मदरसाच्या वतीने आयोजित स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख व वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय चांदखेडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मदरसा मधिल उपस्थित विद्यार्थी व विश्वस्त हुसेन मुलानी, जाफर शेख, ताहेर शेख, मुद्द्सर शेख, मौलाना सय्यद, हाफिज अहमद, करीम शेख, नासिर शेख यांच्यासह उपस्थित  मुस्लिम बांधवांनी राष्ट्रध्वजाला वंदन करुन राष्ट्रगीत म्हटले.

पुणे : पिंपळे गुरव, सुदर्शननगर येथील इशाअते दिन मदरशा अरबियाँच्या विद्यार्थांनी भारतमातेचा जयघोष करीत आजच्या ७१ व्या स्वातंत्र दिनाला राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

मदिना मशिद आणि मदरसाच्या वतीने आयोजित स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख व वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय चांदखेडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मदरसा मधिल उपस्थित विद्यार्थी व विश्वस्त हुसेन मुलानी, जाफर शेख, ताहेर शेख, मुद्द्सर शेख, मौलाना सय्यद, हाफिज अहमद, करीम शेख, नासिर शेख यांच्यासह उपस्थित  मुस्लिम बांधवांनी राष्ट्रध्वजाला वंदन करुन राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर सर्वांनी तीन वेळा भारतमाता की जय... असे म्हणून सभोवतालचा परिसर दुमदुमवून टाकला.
 
यावेळी मदरसा मधिल चिमुरड्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक चांदखेडे आणि त्यांच्या सहकार्र्याःचे पुष्प देऊन स्वागत केले. 

Web Title: Pune news Indapendence day celebrate in madarsha