भारतातील तरूण युवा वर्ग जगात महत्वाच्या पदावर- वळसे पाटील

युनूस तांबोळी
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): भारत देश हा विविध जाती धर्म व संस्कृतीने जगात आगळावेगळा म्हणून ओळखला जातो. स्व. माजी राष्ट्रपती डॅा. अब्दुल कलाम यांचे भारताला महासत्ता बनवायचे स्वप्न होते. सध्या लोकसंख्या व रोजगारामुळे वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक वेगवेगळा विचार करू लागले आहेत. त्यातून नक्षलवादी, आतंकवादी संघटना कार्यरत होऊ पहात आहेत. त्यात प्रदेश काबीज करण्याच्या हेतूने चिनचे आरमार हिंदी महासागरा पर्यंत येऊन पोहचले आहे. अशी संकटे असली तरी देखील भुमीचे संरक्षण करण्यासाठी तरूणवर्ग बौद्धीकदृष्ट्या क्रियाशिल आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): भारत देश हा विविध जाती धर्म व संस्कृतीने जगात आगळावेगळा म्हणून ओळखला जातो. स्व. माजी राष्ट्रपती डॅा. अब्दुल कलाम यांचे भारताला महासत्ता बनवायचे स्वप्न होते. सध्या लोकसंख्या व रोजगारामुळे वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक वेगवेगळा विचार करू लागले आहेत. त्यातून नक्षलवादी, आतंकवादी संघटना कार्यरत होऊ पहात आहेत. त्यात प्रदेश काबीज करण्याच्या हेतूने चिनचे आरमार हिंदी महासागरा पर्यंत येऊन पोहचले आहे. अशी संकटे असली तरी देखील भुमीचे संरक्षण करण्यासाठी तरूणवर्ग बौद्धीकदृष्ट्या क्रियाशिल आहे. आजपर्यंत भारतातील तरूण युवा वर्गाने जिद्द व आत्मविशासाने जगात महत्वाच्या पदावर विजय मिळवला आहे, असे मत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

पारगाव (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रेय नगर मध्ये भिमाशंकर कारखाना संचलीत दत्तात्रेय वळसे पाटील उच्च विद्यालयात 71 व्या स्वातंत्रदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी परदेशी विद्यार्थी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. श्रीलंकेच्या डॅा. केवील डिसेल्व्हा व अमेरीकेचे डॅा. अबीजेल वालकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वळसे पाटील म्हणाले की, 'गुलामगीरी व युद्ध अशा अनेक संकटातून देशाने स्वातंत्र मिळविले आहे. यासाठी अनेक हुतात्म्याचे बलीदान महत्वाचे आहे. त्यातून कृषी, तंत्रज्ञान, वैद्यकिय, माहिती आणी तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. त्यामुळे जगात भारत हा महासत्ता बनत असताना परदेशातून अनेक वि्द्यार्थी या विविध जातीच्या, ऐतीहासीक व सांस्कृतीक देशाचा अभ्यास करताना दिसतात. या भागातील शैक्षणीक संस्था ह्या परीसरातील नागरीकांनी दिलेल्या त्यागातून निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या केल्या आहेत. जगातील सर्व क्षेत्रामधील ज्ञान या भागातील विद्यार्थ्यांना मिळावे. यासाठी शिक्षक देखील प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी व्हावा. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर देखील होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील गरीब घरातील विद्यार्थी परदेशात वेगेवेगळ्या क्षेत्रात नाव लौकीक मिळू लागले आहेत. श्रीलंका आणी अमेरीका यांच्याशी भारताची मैत्री आहे. त्यातून विकास व तंत्रज्ञानात प्रगती होण्यास मदत होत आहे.'

ऐतीहासीकक्षणी परदेशी विद्यार्थी...
स्वातंत्रदिन सोहळ्यात सामील झाल्याने या अनोख्या कार्यक्रमात या परदेशी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. परदेशी विद्यार्थी डॅा. वालकर म्हणाले की, 'भारताने स्वातंत्र मिळविण्यासाठी अनेक लढे दिले आहेत. विद्यार्थ्यांना डॅाक्टर, वकील, उत्तम अभीयंता बनायचे असेल जिद्द महत्वाची आहे. तुम्ही मनाचा निर्धार केला तर जीवनात सगळ काही साध्य करू शकता.' परदेशी विद्यार्थी डिसेल्हवा म्हणाले की, 'भारत हा ऐतीहासीक, धार्मीक व सांस्कृतीक देश आहे. कष्ट व चिकाटीच्या जोरावर तुम्ही यश संपादन करू शकता.'

Web Title: pune news indinan youth world and dilip walse patil