आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पुणे - आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांचा सहभाग असलेला बारा दिवस चालणारा ‘आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव’ बुधवारपासून (ता. १) पुण्यात होणार आहे.

‘अभिनेता आणि अभिनय’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात रंगभूमी व नाट्याविषयी होणाऱ्या कार्यशाळेत जगभरातील नामवंत रंगकर्मी, अभ्यासक व तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तसेच भारतासह अमेरिका, जपान, कॅनडा अर्जेंटिना, बांगलादेश, जर्मनी, इटली, कोरिया, श्रीलंका व टर्की आदी देशातील नाटकांचे सादरीकरण होईल.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस अँड रिसर्चतर्फे (आयएपीएआर) टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृह व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात हे महोत्सव भरविण्यात आले आहे. युनेस्कोच्या ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट’चे महासंचालक टोबिआस बिआंकोने, दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज, नाट्यदिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड व लेखक अभिराम भडकमकर मार्गदर्शन करणार आहेत. 

महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे म्हणाले, ‘‘आयपार महोत्सवातून भारतीय संस्कृती आणि अन्य संस्कृतीमध्ये आणि त्याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगकर्मींमध्ये संवाद घडवण्याचा प्रयत्न आहे.’’

Web Title: pune news international natya mahotsav start in pune