‘आयटीआय’मध्ये रोबोटिक्‍स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही रोबोटिक्‍स येणार आहे. त्याची सुरवात औंध येथील शासकीय आयटीआयमध्ये झाली आहे. रोबोटिक्‍सचे धडे देणारी ही देशातील पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठरणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून तेथे हा अभ्यासक्रम सुरू होईल. 

पुणे - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही रोबोटिक्‍स येणार आहे. त्याची सुरवात औंध येथील शासकीय आयटीआयमध्ये झाली आहे. रोबोटिक्‍सचे धडे देणारी ही देशातील पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठरणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून तेथे हा अभ्यासक्रम सुरू होईल. 

औंध येथील आयटीआय आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था आहे. बाजारपेठेला आवश्‍यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम तेथे चालविले जातात. त्यात रोबोटिक्‍सची भर पडली आहे. याशिवाय एका ऑटोमोबाइल कंपनीच्या मदतीने विद्यार्थ्यांना वाहन दुरुस्ती आणि सेवा याचे प्रशिक्षण आणि ‘कमवा आणि शिका’ धर्तीवर त्यातून उत्पन्न, असा उपक्रम ही संस्था राबवीत आहे.

उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी स्वयंचलित यंत्रांची गरज असते. रोबोटिक्‍स अभ्यासक्रमातून त्याचे तंत्र, यंत्रांची देखभाल दुरुस्ती विद्यार्थ्यांना शिकविली जाईल. लॉजिक, अल्गोरिद, कंट्रोल पॅनेल, प्रोग्रॅमिंग, ऑटोमेशन यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी ‘रोबो टेक्‍निशियन’ म्हणून बाहेर पडतील. यामुळे ऑटोमोबाइल, स्टील यांसह विविध उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळू शकेल. हा उपक्रम सुरू करण्यासाठी जागतिक बॅंकेने विशेष निधी दिला होता, असे या विभागाचे सहसंचालक राजेंद्र घुमे यांनी सांगितले.

सर्व्हिसिंगचा अभ्यासक्रम
वाहन सर्व्हिसिंग अभ्यासक्रम या संस्थेने सुरू केला आहे. यात इजिंन चाचणी, ब्रेक- क्‍लच व इलेक्‍ट्रॉनिक भागांची दुरुस्ती शिकविण्यात येते. संस्थाबाह्य नागरिकांच्या वाहनांच्या दुरुस्तीची कामे घेऊन यातून विद्यार्थ्यांना गॅरेजचा व्यवसाय, वाहनांच्या सुट्या भागांची दुकाने टाकता येऊ शकतील. तसेच ऑटोमाबाइल कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळेल. ऑटोमोबाइल क्षेत्रासंबंधी चार व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा कौशल्य वाढविण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे. 

१००  - दरवर्षी रोबो टेक्‍निशियन म्हणून आयटीआयमधून बाहेर पडणारे विद्यार्थी.
२५० - दरवर्षी ऑटोमोबाइल सेवेचे कौशल्य मिळवून संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी.

Web Title: pune news iti robotics