हडसर वळणावर एस.टी. बस उलटून चार प्रवासी जखमी

दत्ता म्हसकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

हडसर येथे वळणावर पावसामुळे रस्ता साईड पट्टी खचलेली होती. बस खाली आल्याने ती अधिक खचली व यामुळे बस पलटी झाली.

जुन्नर : एस.टी. बस पलटली चालक, वाहकासह चार प्रवासी जखमी झाले. जखमी आज सोमवार (दि. 28) रोजी जुन्नर ते राजुर दरम्यानची एस.टी. बस क्र. MH12 EF 6105 ही समोरून येणाऱ्या दुचाकीला बाजूने रास्ता देण्यासाठी रस्त्याच्या कडेला घेतली असता  पलटी झाली.

हडसर येथे वळणावर पावसामुळे रस्ता साईड पट्टी खचलेली होती. बस खाली आल्याने ती अधिक खचली व यामुळे बस पलटी झाली. बसमध्ये चालक व वाहकासह चार प्रवासी होते. हे सर्वजण किरकोळ जखमी झाले. त्यांचेवर जुन्नर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एस.टी अधिकारी यांनी दवाखान्यात भेट देवुन  मदत जखमीना उपचारार्थ मदत दिली. 

जखमी व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे : बस वाहक- श्रीमती जयश्री संतोष डोके. (वय 32, रा. जुन्नर), सौ. विठ्ठाबाई किसन शिदे (वय 55, रा. नारायणगाव), स्वप्नाली शिवाजी डुबरे  (वय 18, रा. हडसर जि.पुणे), सौनिल दिनकर वायाळ चालक नारायणगाव, बंडु विठ्ठल सुपे, (वय 50 राजुर नं. 1), प्रियंका नवनाथ आहेर (वय 18, हडसर)

Web Title: pune news junnar accident four injured