शालेय पोषण आहारात आढळले मुदतबाह्य पदार्थ; जुन्नरमध्ये कारवाई

दत्ता म्हसकर
सोमवार, 17 जुलै 2017

तपासणी पथकाने गोपनीयरीत्या दिलेल्या अचानक भेटीतून अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून, त्या अनुषंगाने पुढील कारवाई होईल, असे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.

जुन्नर : शालेय पोषण आहार योजनेचा मुदतबाह्य झालेला सुमारे 31 हजार रुपयांहून अधिक रकमेचा कांदा मसाला व हळद शिक्षण विभागाकडून जप्त करण्यात आला आहे. बचत गटासह ठेकेदारावरही कारवाई करणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी के.डी. भुजबळ यांनी सांगितले. 

गटशिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ आणि विस्तार अधिकारी शिक्षण के.बी. खोडदे व सहायक कार्यक्रम अधिकारी अशोक लांडे यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन मंगळवारी दुपारी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या आळे येथील सहेली बचत गटाच्या अध्यक्षा यांच्या राहत्या घरी भेट देऊन पाहणी केली व साठ्याची, जागेची व मालाच्या दर्जाची तपासणी केली. त्यावेळी बचत गटाकडे 200 रुपये किमतीची प्रत्येकी एक किलोची  144 पाकिटे मुदत बाह्य झालेली मिळून आली. तसेच हळदीची पाकिटे पण मुदतबाह्य झालेली मिळून आली.

तपासणी पथकाने गोपनीयरीत्या दिलेल्या अचानक भेटीतून अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून, त्या अनुषंगाने पुढील कारवाई होईल, असे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
शंभर टक्‍के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री
ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...!​
द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा​
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण​
फेडररचे विक्रमी विजेतेपद​
भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी​
काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर​
‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’​

Web Title: pune news junnar news action against midday meal outdated