जुन्नरमध्ये लोकशासन आंदोलकांच्या हल्ल्यात पाच पोलिस जखमी

दत्ता म्हसकर
रविवार, 2 जुलै 2017

लोकशासन आंदोलकांच्या हल्ल्यात जुन्नरच्या सहाय्यक वनसंरक्षकासह पाच कर्मचारी जखमी झाले आहेत.

जुन्नर (जि. पुणे) : लोकशासन आंदोलकांच्या हल्ल्यात जुन्नरच्या सहाय्यक वनसंरक्षकासह पाच कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी गुन्हे दाखल करु नये म्हणून आंदोलकांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात येऊन घेराव घातला. सहाय्यक वनसंरक्षक श्रीमंत गायकवाड, प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र आधिकारी गणेश टेकाळे, वनपाल मनिषा काळे, वनरक्षक शिवाजी राठोड व सुवर्णा खुटेकर अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत काळे यांनी सांगितले की, वडगाव कांदळी येथील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रातील मे महिन्यात आंदोलकांच्या अतिक्रमण करुन केलेल्या झोपड्या काढून टाकण्यात आल्या होत्या. या ठिकाणी पुन्हा राहण्याचे हेतूने झोपड्या बांधत असल्याचे समजल्याने अतिक्रमणे पुन्हा काढण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येथे आले होते. यावेळी आंदोलकांनी दगड फेकले होते. यामध्ये कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबतीत पोलिस कार्यवाही सुरू आहे.

ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

Web Title: pune news junnar news agiation attack on police