माणिकडोह धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा

दत्ता म्हसकर
मंगळवार, 18 जुलै 2017

गेल्या वर्षीपेक्षा १०० मिलीमीटरने पाऊस जास्त

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील शहाजीसागर जलाशयातील पाणीसाठ्यात गेल्या वर्षी पेक्षा भरीव वाढ झाली असल्याचे शाखा अभियंता काशिनाथ देवकर यांनी सांगितले.

धरणात आज ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, गतवर्षी तो २ हजार ५०० इतका होता, पाणीसाठ्यात १०० दशलक्ष घनफुटने वाढ झाली आहे. आज रोजी धरण ३५% भरले आहे, तर मागील वर्षी ते २४.५० % होते. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जूनपासून चांगला पाऊस होत आहे. धरणात २५०० ते ३००० क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे.

पाऊसदेखील गेल्या वर्षीपेक्षा १०० मिलीमीटरने जास्त असल्याचे नोंदीवरून स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहील्यास यावर्षी धरणात चांगला पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Pune news junnar news manikdoh dam water storage