पुणे: जुन्नर तालुक्‍यातील मढ खोऱ्यात रोहित पक्षांचे आगमन

पराग जगताप
मंगळवार, 11 जुलै 2017

प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या रोहित पक्षाचे जुन्नर तालुक्‍यातील मढ खुबी येथील खिरेश्‍वर परिसरात आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि पर्यटकांची या परिसरात गर्दी होत आहे.

जुन्नर (जि. पुणे) - प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या रोहित पक्षाचे जुन्नर तालुक्‍यातील मढ खुबी येथील खिरेश्‍वर परिसरात आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि पर्यटकांची या परिसरात गर्दी होत आहे.

प्रत्येक पावसाळ्यात रोहित पक्षी ऑस्ट्रेलियातून स्थलांतरित होऊन मढ खुबी खिरेश्वर व पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशय परिसरात येतात. यंदाही रोहित पक्षांचे आगमन झाले आहे. जलाशयावर मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्षांचे दृश्‍य विलोभनीय दिसत आहे. रोहित पक्षांना पाहणे ही पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात पक्षांच्या रुपाने ऑस्ट्रेलियाने भारतात आलेल्या या पाहुण्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

Web Title: pune news junnar news marathi news sakal news rohit bird

फोटो गॅलरी