मीना, मांडवी नदीला पूर; जुन्नरला रात्रीपासून पाऊस

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 14 जुलै 2017

खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

जुन्नर : रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने जुन्नर तालुक्यातील पाच धरणांच्या पाणी साठ्यात भरीव वाढ झाली आहे. दक्षता म्हणून वडज व चिल्हेवाडी धरणांतून अनुक्रमे तीन व तेरा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मीना व मांडवी नदीला पूर आला आहे.

तालुक्यात एकूण ४८७ मिली पावसाची नोंद झाली असून सरासरी ५४.१ इतकी आहे. खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. तर रखडलेल्या पेरण्या व भात लावणी जोमाने सुरु झाल्या आहेत.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: pune news junnar news rains meena mandavi river flooded