कन्हैया कुमार 28 जानेवारीला पुण्यात 

कन्हैया कुमार 28 जानेवारीला पुण्यात 

पुणे - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता कन्हय्या कुमार यांच्या उपस्थितीत येत्या 28 जानेवारीला शनिवारवाड्यावर "सावधान परिषदे'चे आयोजन केले आहे, अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरेगाव भीमासह लगतच्या पाच गावांमध्ये घडलेल्या दगडफेक व जाळपोळीच्या पार्श्‍वभूमीवर मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत जातीयवादी व धर्मांध शक्तीविरोधी लढण्यासाठी मातंग समाजाने एकत्र येण्याचे ठरले आहे. मातंग समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रा. सकटे म्हणाले, ""या परिषदेला राज्यातून 10 हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी समविचारी संघटनांना सोबत घेतले जाणार आहे. बेरोजगारीच्या प्रश्‍नांऐवजी राज्य सरकार समृद्धी मार्ग आणि धरणांवर चर्चा करत आहे. मात्र त्यातून विस्थापित शेतकऱ्यांवर मात्र चर्चा करत नाही. विचारांपेक्षा जातीला महत्त्व प्राप्त झाले असून, हे समाजाच्या विकासासाठी मारक ठरत आहे. कन्हैया कुमारच्या उपस्थितीत या परिषदेत धर्मांध शक्तीविरोधी लढा उभारण्यासाठी बहुजन समाजाचा कृती आराखडा तयार केला जाईल. या परिषदेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भारत पाटणकर, प्रवीण गायकवाड आणि अन्य नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com