निवृत्त पोलिस अधिकाऱयाने शेती बरोबरच सुरू केला मत्सव्यवसाय

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील निवृत्त पोलिस निरीक्षक बाबाजी तांबोळी यांनी शेती बरोबरच मत्सव्यवसाय सुरू केला आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील निवृत्त पोलिस निरीक्षक बाबाजी तांबोळी यांनी शेती बरोबरच मत्सव्यवसाय सुरू केला आहे.

भांडवल, मजूरी, व्यवस्थापन व बाजारभाव यातून शेती व्यवसाय ओळखला जातो. फक्त बांधावर उभे राहून शेतीव्यवसायाला चालना मिळत नाही. त्यासाठी शेती करत पुरक व्यवसायाला चालना दिली तर अधिक प्रगती होताना दिसते. मत्सव्यवसाय हा देखील तसाच विषय आहे. मोठे भांडवल असले तरी योग्य व्यवस्थापनातून या व्यवसायात चांगले उत्पादन घेता येते.

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील माजी पोलिस अधिकारी बाबाजान लालभाई तांबोळी यांनी पोलिस खात्यात 1968 मध्ये पोलिस कॅान्सेटबल म्हणून भरती झाले. 1981 मध्ये पोलिस उपनिरीक्षक तर 1997 मध्ये पोलिस निरीक्षक पदापर्यंत काम पाहिले आहे. सातारा, पुणे शहर, पुणे रेल्वे, सोलापूर, नगर या ठिकाणी त्यांनी पोलिस खात्याअंतर्गत काम केले आहे. गुन्हे अन्वेषण विभाग व अॅन्टीकरप्शन या साराख्या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. जवळपास सहाशे ते सातशे गुन्ह्याचा तपास त्यांनी केला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात तपासकामी त्यांचा चांगलाच दरारा होता. अहमदनगर येथील कोठेवाडी दरोडा प्रकरणी त्यांनी योग्य दिशेने तपास केला होता. त्यामुळेच त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. नोकरी कामी त्यांना बाहेर गावी रहावे लागले. त्यामुळे कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील साडेपाच एकर क्षेत्र पडीक पडले होते. हा परीसर तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. निवृत्ती नंतर काय करावयाचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

मित्राने दिला सल्ला...
मत्सविभागाचे माजी सहायय्क आयुक्त साहेबराव पाटील हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी पडीक पडलेल्या क्षेत्रात काय करावयाचे याचा सल्ला विचारला. कृषीपर्यटनस्थळ चिंचोली मोराची या परीसराजवळ हा भाग असल्याने येथे नेहमीच पर्यटक फिरताना दिसतात. त्यामुळे या भागात वेगळे काहीतरी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. काही क्षेत्रात शेती फुलविण्याचा तर त्याबरोबर मत्सव्यवसाय करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पाणी व्यवस्थापन...
मत्सव्यवसाय आणी पाणी हे जवळचे नाते आहे. कान्हूर मेसाई हा भाग तसा दुष्काळी भाग समजला जातो. उन्हाळ्यात येथे नेहमीच टॅंकरने पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. पाणी व्यवस्थापन करणे हा येथील मुळ प्रश्न होता. त्यातून गणेगाव खालसा येथून चासकमान कालव्यातून पाईप लाईन करून त्यांनी या ठिकाणी पाणी आणले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी प्रश्न सुटला आहे. त्यांच्या या क्षेत्राजवळून ओढा वाहतो. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने कुपनलीका व विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे मत्सव्यवसायाला अधिक चालना मिळाली आहे.

शेततळे...
शेती क्षेत्राच्या सुरवातीला सपाट भाग होता. त्या ठिकाणी त्यांनी दोन शेततळे घेण्याचे ठरले. त्यातून त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात पहिले शेततळे बांधले आहे. 30 गुंठे क्षेत्रात 7 ते 8 फुट खोलीकरण करून त्यांनी प्लास्टीक कागद टाकून हे शेततळे तयार केले आहे. त्याच्या खालच्या बाजूस 20 गुंठ्यात दुसरे शेततळे तयार करण्यात आले आहे. त्याच्याभोवती लोखंडी तारेचे कुंपन तयार करण्यात आले आहे. यासाठी त्यांना साडेसहा लाख रूपये खर्च आला आहे.

मत्सबिज...
पुणे येथील अॅग्रीकल्चर कॉलेज मधिल मत्सविभागाचे त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर गुजरात व आंध्रप्रदेश मधून मत्सबिज आणले आहे. 30 गुंठ्यात असणाऱ्या शेततळ्यात त्यांनी रव व कटला जातीचे मत्सबिज टाकले आहे. तर 20 गुंठे क्षेत्रात कोळंबीचे बिज टाकले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या शेततळ्याचे त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे. त्यामुळे सध्या 300 ग्रॅम पेक्षा अधिक वजन या माशांचे झाले आहे. जवळपास 2 ते 3 किलो वजनाचे हे मासे होत असतात. तर कोळंबी 100 ग्रॅम पेक्षा अधिक होत असते. खाद्य व देखभालीसाठी त्यांनी नागनाथ जाधव या कामगाराला ठेवले आहे. त्याच्या व्यवस्थापनातून हा व्यवसायाला भरभराटी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर पिके...
शेततळ्यातील पाणी व्यवस्थापन करत असताना हे पाणी काही प्रमाणात उर्वरीत शेतीला देऊन त्यांनी इतर पिके घेत आहेत. उर्वरीत क्षेत्रात सध्या त्यांनी मका व ज्वारीचे पीक घेतले आहे. त्यांचे हे पिक देखील जोमाने वाढत आहे.

व्यवस्थापनातून फायदा...
मत्सव्यवसायला 1 ते 2 वर्षे चांगेल व्यवस्थापन केल्यावर चांगले उत्पदन मिळते. त्यातून त्यांना 12 ते 13 लाख रूपयांचे उत्पादन मिळण्याची आशा आहे. भविष्यात उर्वरीत क्षेत्रात कृषी पर्यटन करून पर्यटकांना आकर्षीत करणार आहे. चुलीवरच्या भाकरी, बांधावरची सहल तसेच मांसाहारी खवय्यासाठी मेजवाणी करण्याचे त्यांनी ठरविले आहे. जिरायत क्षेत्रात वेगळे काही करून चांगले आर्थीक उत्पन्न मिळू शकते. याचे उत्तम उदाहरण त्यांनी या मत्सव्यवसायातून करून दाखविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com