पुणेः वीज बिले चुकीची येत असल्याने शिवसेनेचे आंदोलन

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

खडकवासला (पुणे): चुकीची बिले, असुरक्षित ट्रान्सफॉर्मर, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा होत असल्याच्या कारणावरून शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने वडगाव धायरी विभागातील महावितरण कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश कोंडे, यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. जयसिंग दांगट, शिवभाऊ पासलकर, संतोष गोपाळ, निलेश  गिरमे, महेश पोकळे, अमोल दांगट, दत्ता  रायकर, युवासेनेचे  जिल्हाप्रमुख सचिन पासलकर, सुशांत खिरीड, अण्णा दिघे उपस्थित होते.

यावेळी चुकीची बिले, असुरक्षित ट्रान्सफॉर्मर, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या विषयांवर निवेदन देऊन येत्या 15 दिवसात कामकाज सुरळीत करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pune news khadakwasla electricity bill and shivsena