खडकवासला परिसरात चालत्या मोटारीला आग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

खडकवासला - खडकवासला धरणाच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर चालत्या मोटारीने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण मोटार जळून खाक झाली आहे. मोटारीतील तिघे जण पटकन बाहेर आल्यामुळे वाचले. 

खडकवासला - खडकवासला धरणाच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर चालत्या मोटारीने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण मोटार जळून खाक झाली आहे. मोटारीतील तिघे जण पटकन बाहेर आल्यामुळे वाचले. 

गाडीचे मालक सुनील भगवानराव कुलाव हे मित्र सुधीर बापू आदवडे, सुजित काशिनाथ देशमुख यांच्यासह खडकवासला परिसरात फिरण्यास आले होते. धरणाच्या खालील रस्त्याने ते वारजे माळवाडी येथे घरी परत जात होते. नदीवरील पुलाच्या अलीकडे गाडीच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला. ते पाहताच गाडी चालविणाऱ्या सुनील याने गाडी थांबवली आणि मित्रांना गाडीबाहेर पडण्यास सांगितले. ते गाडीतून उतरताच आग वाढली. सिंहगड रस्ता अग्निशामक दलाचे तांडेल पांडुरंग तांबे, तुषार करे, सतीश डाकवे, मनोज ओव्हाळ यांनी आग विझविली. 

Web Title: pune news khadakwasla fire van