खमंग, रुचकर, स्वादिष्ट खाण्याची संधी

खमंग, रुचकर, स्वादिष्ट खाण्याची संधी

पुणे - खमंग, रुचकर, स्वादिष्ट खाणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. खाण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या पुणेकर खवय्यांसाठी ‘सकाळ’ घेऊन येत आहे ‘खाऊ गल्ली - सीझन ५’. ‘खाणे सोबत गाणे’ अशा धमाल मस्तीच्या ‘खाऊ गल्ली - सीझन ५’चे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजन केले आहे. २३, २४ व २५ डिसेंबरला पुणेकरांना विविध प्रकारचे आणि ठिकाणांचे खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. 

मस्का भाजी, सुप्स, व्हेज- नॉनव्हेज दम बिर्याणी, प्रॉन्स खिचडी, तांबडा व पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ, अख्खा मसूर, रबडी, दहीवडा, मोदक, खिमा पाव, साउथ इंडियन, पंजाबी, पिठलं- भाकरी, वांग्याची भाजी, भजी, वडापाव, महाराष्ट्रीयन स्नॅक्‍स, सॅंडविच, तंदूर स्पेशल, सी फूड, मालवणी, चाट कॉर्नर, चिकन, फिश स्नॅक्‍स, आइस पान, आइस्क्रीम पान, फायरपान, चॉकलेट पान, मसाला पानाचे तब्बल चाळीसहून अधिक प्रकार आणि असंख्य खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश असेल. अधिकाधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सोबत लाइव्ह वाद्यवृंदाची मेजवानी हे या खाऊ गल्लीचे वैशिष्ट्य आहे.

गेल्या चार- पाच वर्षांपासून आम्ही खाऊ गल्लीत सहभागी असतो. दरवर्षी आम्ही आमचे प्रॉडक्‍ट्‌स डिस्प्ले करतो; पण यावेळेस डिस्प्लेसोबत आम्ही सॅम्पल्स देणार आहोत. तसेच, काही ॲक्‍टिव्हिटीज करण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये काही स्पर्धा असतील आणि गिफ्ट म्हणून आम्ही आमचे प्रॉडक्‍ट्‌स देणार आहोत. 
- विनीत भोसले, जेमिनी ऑइल व नेचर फ्रेश आटा

आमच्या पतसंस्थेतील निरनिराळ्या कर्जपुरवठा योजनांची माहिती आम्ही देणार आहोत. आमच्याकडे बचत गटांतील महिलांसाठी अनेक कर्ज योजना आहेत. तसेच, आम्ही बचत गटांतील महिलांनी बनवलेल्या मालाची ऑनलाइन विक्रीही करतो. इतकेच नव्हे, तर ऑरगॅनिक किराणा सामान तसेच सॅलड्‌स, स्मुदी घरपोच देतो. याविषयीची माहिती आमच्या स्टॉलवर ग्राहकांना मिळेल.  
- शिरीष देशपांडे, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

वाद्यवृंदाचे सादरीकरण
‘खाऊ गल्ली’मध्ये जितेंद्र भुरुक व त्यांच्या वाद्यवृंदाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाचा आनंद संध्याकाळी ६.३० ते रात्री नऊपर्यंत घेता येणार आहे. शनिवार (ता. २३) ‘गोल्डन इरा ऑफ हिंदी म्युझिक’, रविवार (ता. २४) ‘किशोर कुमार स्पेशल’, तर सोमवारी (ता. २५) ‘रोमॅंटिक ड्युएट्‌स’ हे कार्यक्रम होणार आहेत. बच्चेकंपनीसाठी गेमिंग झोन आहे. खाऊ गल्लीचे फूड पार्टनर जेमिनी ऑइल व नेचरफ्रेश आटा, कुकीज पार्टनर द बेक फॅक्‍टरी, केक पार्टनर डब्लूएस बेकर्स, बॅंकिंग पार्टनर बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., हनी पार्टनर सातमाह हनी आहेत. मुख्यत: हा खाद्यमहोत्सव महालक्ष्मी लॉन्सच्या आच्छादित भागात आहे, त्यामुळे दुपारच्या उन्हाचा त्रास होणार नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी अल्प प्रवेश शुल्क आकारले जाईल. पार्किंगची सोय आहे. 

कोठे : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर 
केव्हा : २३, २४ व २५ डिसेंबर 
कधी : सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com