पुणे: शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

रस्त्याच्या कामाला पाडव्याचा मुहूर्त
​पुणे-सातारा रस्त्यावर वेळु (ता.भोर) येथे अनेक दिवस बंद असलेले डांबरीकरणाचे काम 'केसीपीएल'ने गर्दीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुरु केले आहे. त्यामुळे याठिकाणीही सकाळ पासून वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावरील पेट्रोल पंप तसेच हॉटेलमध्येही आज वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

खेड-शिवापुर : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांमुळे शुक्रवारी पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यातच टोल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे खेड-शिवापुर टोल नाक्यावर सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

दिवाळी सणानिमित्त सातारा, सांगली, कोल्हापुर आदी भागात आपल्या गावी जाण्यासाठी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पड़ले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर शुक्रवारी सकाळपासूनच मोठी गर्दी आहे. विशेषतः पुणे-सातारा लेनवर वाहनांची संख्या जास्त आहे. 

अशा परिस्थितीत खेड-शिवापुर टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली असून सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता टोल प्रशासनाने जलद टोल आकारणीचे नियोजन करणे गरजेचे होते. टोल आकारणी मशीन तसेच कर्मचाऱ्यांची संख्या टोल नाक्यावर अपुरी होती. त्यामुळे एका वाहनास टोल देऊन पुढे जाण्यास सुमारे पंधरा मिनिटे वेळ लागत आहे. त्यामुळे पुणे-सातारा लेनवर नवीन टोल नाक्यापासून बँगला चौकापर्यंत सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल नाक्यावर वेळ वाया जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोल प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभाराबद्दल प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

रस्त्याच्या कामाला पाडव्याचा मुहूर्त
पुणे-सातारा रस्त्यावर वेळु (ता.भोर) येथे अनेक दिवस बंद असलेले डांबरीकरणाचे काम 'केसीपीएल'ने गर्दीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुरु केले आहे. त्यामुळे याठिकाणीही सकाळ पासून वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावरील पेट्रोल पंप तसेच हॉटेलमध्येही आज वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

Web Title: Pune news Khed Shivapur toll plaza traffic