‘किड्‌स अँड मॉम फेस्ट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

‘सकाळ’ व पुणे ‘सेंट्रल मॉल’तर्फे आयोजन; डान्समध्ये रमली मुले 
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आई व मुलांनी एकत्रिकरीत्या नृत्याचा आनंद घ्यावा, यासाठी ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘किड्‌स अँड मॉम फेस्ट’ व नृत्य स्पर्धेत कोमल कमलाकर (ग्रुप ‘ए’ नर्सरी ते तिसरी), दिया गोंचर (ग्रुप ‘बी’ चौथी ते सहावी) आणि वैष्णवी उंब्रे (ग्रुप ‘सी’ सातवी ते दहावी) यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले. कोरेगाव पार्क येथील नीतेश हबमधील सेंट्रल मॉलमध्ये झालेल्या या फेस्टला मुले व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आई आणि मुलांच्या नृत्याचा आनंददायी सोहळा यानिमित्ताने अनुभवायला मिळाला. नृत्य दिग्दर्शक मृदंग देसाई यांनी ‘बेबी अणि मॉम वर्कशॉप’चे आयोजन केले होते. तीन गटांत झालेल्या स्पर्धेत पाच ते १५ वर्षे वयोगटातील मुले सहभागी झाली होती. 
मिताली कालींग, चिन्मयी बोबडे, आर्यन तिकोने, आर्यन शेलार, श्रुती शर्मा, हिमांशी मोदी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. 

अगदी लहान मुलांमध्येही खूप टॅलेंट आहे अणि मुले खूप ॲक्‍टिव्ह आहेत. या ‘फेस्ट’मध्ये नृत्य दिग्दर्शन व परीक्षण करण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. 
- मृदंग देसाई, नृत्य दिग्दर्शक व परीक्षक 

या ‘फेस्ट’चा एक भाग असल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. अशा ‘फेस्ट’मधून लहान मुलांच्या क्रिएटिव्हीटीला वाव मिळतो. सर्वच मुलांनी अतिशय चांगले सादरीकरण केले. 
- अरविंद भाटी, स्टोअर मॅनेजर, पुणे सेंट्रल मॉल, कोरेगाव पार्क

Web Title: pune news kids mom fest