ढगाळ हवामानाची कोकणात शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे - दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. मालदीव ते अरबी समुद्र आणि कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकणात ढगाळ हवामान तयार होण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बुधवारी (ता. 7) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. उत्तर भारत आणि मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे; तर पश्‍चिम बंगाल, हिमालय, भूतान आणि बांगलादेशच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून, राज्याच्या उर्वरित भागात सरासरीच्या जवळपास होते. राज्यात उस्मानाबाद येथे 10.7 अंश सेल्सिअस असे सर्वांत कमी; तर पुण्यात 13.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गोव्यासह संपूर्ण राज्यात मंगळवारी (ता. 6) हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: pune news konkan environment