कोरेगाव पार्क परिसरात सराईताकडून दोन पिस्तूल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांनी एका सराईताकडून दोन पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त केली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली. 

पुणे - कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांनी एका सराईताकडून दोन पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त केली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली. 

गणेश कारभारी साबळे (वय 28, रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेशोत्सवादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, कोरेगाव पार्क परिसरात एक जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस नाईक अतुल साठे यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

तसेच, दुचाकी चोरी करून तिच्यावर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या आरोपीला पिंपरी परिसरातून अटक केली. मोबीन मेहबूब शेख (वय 22, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 50 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे.

Web Title: pune news koregaon park crime