बहीणीच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटून परतणा-या मजूराचा मृत्यू

death
death

हडपसर - बहीणीच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटून घरी परतत असताना आज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना फुरसुंगी येथे घडली. याबाबत याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

बबन शिवा चव्हाण (वय २६, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी) असे अपघातात मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे. बबन हा हैदराबाद येथील दोरनापल्ली गावचा रहिवासी आहे. भोसले व्हिलेज येथील एका बांधकामावर तो बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या बहीणीचे लग्न २३ नोव्हेंबरला आहे. त्या लग्नपत्रिका वाटून तो दोन दिवसांनी गावी जाण्याच्या तयारीत होता. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच पुणे सासवड रोडवर आज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या जवळ राहणा-या नातेवाईकांनी बबनचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या गावी कळवीताच लग्नघरात स्मशान शांतता पसरली. त्याच्या पश्चात पत्नी १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सतिश उमरे करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com