‘संडे सायन्स स्कूल’मध्ये सहभागाची शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचार क्षमता, निर्णय क्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांच्या वतीने ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील रविवार (ता. ११) पासून सुरू होत आहे. 

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचार क्षमता, निर्णय क्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांच्या वतीने ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील रविवार (ता. ११) पासून सुरू होत आहे. 

‘संडे सायन्स स्कूल’मध्ये सहभागी विद्यार्थी दर रविवारी दोन तास विज्ञानातील विविध संकल्पना समजावून घेतात व त्यावर आधारित प्रयोग किंवा सायन्स मॉडेल स्वत: बनवतात. विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल किंवा प्रयोग त्यांना घरी नेता येत असल्याने या साहित्याच्या मदतीने इतरांनाही विज्ञान संकल्पना समजावून सांगणे शक्‍य होते. 

या विशेष उपक्रमात विद्यार्थी जून ते डिसेंबर दरम्यान २२ रविवारी एकत्र जमून प्रयोग करताना विज्ञान शिकणार आहेत. इयत्ता ३ री व ४ थीची मुले या काळात हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, स्वयंपाकघरातील विज्ञान आदी संकल्पनावरील सुमारे ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील.
इयत्ता ५ वी व ६ वीच्या मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल. 

इयत्ता ७ वी ते ९ वी मधील विद्यार्थी सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मोडेल, हायड्रॉलिक आर्म, आर्किमिडीसचे तत्त्व सुमारे ५० प्रयोग व प्रकल्प स्वत: हाताने बनवतात. या सोबतच विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना शेवटी प्रमाणपत्र वितरित केले जाते. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील निवडक ठिकाणी हा उपक्रम ११ जून पासून सुरू होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये जास्तीत जास्त ४० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश निश्‍चित करता येतील.

इ. तिसरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश 
कोथरूड, सातारा रोड, सकाळ कार्यालय, कोंढवा, सिंहगड रोड, बालेवाडी-बाणेर, पिंपळे-सौदागर, चिंचवड, अजमेरा, निगडी, चिखली प्राधिकरण, हडपसर या ठिकाणी वर्ग सुरू होणार आहेत. आपला प्रवेश निश्‍चित करण्यासाठी ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात सोमवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. ९) दरम्यान दुपारी ४ ते ७ दरम्यान भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी ९८५००४७९३३ / ९३७३०३५३६९ किंवा ९०११६३८२८२.

सर्व साहित्यासह शुल्क 
तिसरी-४ थी साठी रु. ४,३००
५ वी - ६ वी साठी रु. ४,८००
७ वी - ९ वी साठी रु. ६,२००

Web Title: pune news last chance in sunday science school