लेप्टोस्पायरोसिसवरून "तू तू मै मैं'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - लेप्टोस्पायरोसिस नियंत्रणाची निश्‍चित जबाबदारी कोणावर, यावरून दोन सहायक आरोग्यप्रमुखांमध्ये "तू तू मैं मैं' सुरू असल्याचे चित्र गुरुवारी महापालिकेत दिसले. उंदराच्या मूत्रातून संसर्ग होणारा लेप्टोस्पायरोसिस हा आजार कीटकजन्य आहे की जलजन्य यावरून या दोन अधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ टोलवाटोलवी सुरू होती.

वारज्यात 74 वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू लेप्टोस्पायरोसिसनेच झाल्याचा अहवाल बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने गुरुवारी दुपारी दिला. तीन वर्षांनंतर लेप्टोस्पायरोसिसचा रुग्ण पुण्यात आढळला. त्यामुळे वारजे भागात या आजारासाठी तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. मात्र, दोन अधिकाऱ्यांमधील या वादात सर्वेक्षणाचे काय होणार, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

उंदराच्या दूषित मूत्रात असलेले रोगजंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. पायाला झालेल्या जखमेतून हे रोगजंतू रुग्णाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे हा जलजन्य आजार असल्याचा दावा, महापालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी केला. पण, त्याला प्रत्युत्तर देत हा आजार उंदराच्या मूत्रातून पसरतो, असा युक्तिवाद सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी केला. राज्याच्या आरोग्य खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अखेर डॉ. साबणे यांनी दिली.

Web Title: pune news leptospirosis sickness