लोकल गाड्यांना विलंब; प्रवाशांचा स्टेशनवरच गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांना गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दररोज विलंब होत आहे. गुरुवारी रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी सुटणारी लोकल गाडी वेळ उलटून गेल्यानंतरही सोडण्यात न आल्याने प्रवाशांनी स्टेशनवरच गोंधळ घातला. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची तक्रारही प्रवाशांनी केली.

गेल्या चाळीस वर्षांपासून पुणे-लोणावळा या मार्गावर लोकलची सेवा सुरू आहे. पहाटे पाचपासून रात्री अकरा पर्यंत ही सेवा सुरू असते. या मार्गावर एकूण चार लोकल गाड्या असून, त्या दिवसात चाळीस फेऱ्या मारतात. प्रवाशांची संख्या मोठी असतानाही या मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आणि जलदगतीने कशी होईल, याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.

पुणे-लोणावळा हे 72 किलोमीटर अंतर आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार पुण्याहून निघालेली लोकल एक ते सव्वा तासात लोणावळ्याला पोचणे अपेक्षित आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून या गाड्यांना हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहे. त्याचा फटका नोकरदारवर्गाला बसत आहे.

गुरुवारी सायंकाळी पुणे व लोणावळा अशा दोन्हीकडून येणाऱ्या लोकल गाड्या वेळेत येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीही उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title: pune news local late