किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमाचा ‘गुंता’

किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमाचा ‘गुंता’

पुणे - ‘‘किशोरवयीन मुलांमध्ये मैत्रीतून प्रेम आणि आकर्षण वाढणे, अशा भावना निर्माण होतात आणि त्यातून चुकीच्या मार्गाने पावले पडत असल्याचे दिसून येते. भावनांशी संबंधित हा गुंता सोडविताना असंख्य प्रश्‍नांना सामोरे जावे लागते आणि वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या मनावर आघात होतात. परिणामी ते कोमेजून जातात. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, पालकांनी त्यांच्यातील शारीरिक, मानसिक बदलांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे,’’ असे चिकित्सालयीन मानसोपचारतज्ज्ञ मृणाल घोळे-मापुस्कर यांनी सुचविले आहे.

आजच्या काळात मुला-मुलींचे एकमेकांशी संवाद साधणे फारच सहज झाले आहे. पूर्वीच्या काळात मुला-मुलींनी एकत्र बोलणे म्हणजेदेखील खूप भयंकर वाटत असे. काळाच्या ओघाने ही सुधारणा झाली आहे; परंतु ही सुधारणा शाप की वरदान हे ठरविता येणे मात्र अवघड असल्याचे मत मृणाल यांनी व्यक्त केले. मृणाल यांनी ‘टीन एज’मधील मुलांमध्ये वाढत चाललेले प्रेम, मैत्री आणि आकर्षण’ विषयाचा ऊहापोह केला. शालेय जीवनात इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांमध्ये मैत्रीतून प्रेम आणि आकर्षण निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, ‘‘साधारणतः ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होत असते. अशावेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ही मुले चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पालकांनी वेळीच दक्ष राहायला हवे. वयात येणाऱ्या मुला-मुलींना समुपदेशन आणि योग्य प्रकारे लैंगिक शिक्षण देण्याची गरज असते. त्यासाठी प्रत्येक शाळेत समुपदेशक असायला हवा.’’

पालकांनी घ्यावयाची खबरदारी 
वयात येणाऱ्या पाल्याच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदलांकडे लक्ष असावे
अनेकवेळा चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगू जातात
मुलांशी मित्रत्वाचे नाते जपावे
गरजेइतकी मोकळीक द्यायला हवी
संवादातून समस्येवर मार्ग काढावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com