सिंहगडावर प्रेमी युगलाची आत्महत्या (व्हिडिओ)

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

खडकवासला (पुणे) : सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याच्या मागे झाडाला दोरीने गळफास घेऊन तरुण प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  मुळशी तालुक्यातील मुठा गावच्या भरेकरवाडीचे ते रहिवाशी आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आहे.

एका पर्यटकाने सिंहगडावरील वन सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हवेली पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोचत आहेत.

सिंहगडावर जाणारा घाटात दरड प्रतिबंधात्मक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद आहे. हे दोघे आतकरवाडीतून गडावर चालत गेली असावेत. हे गडावर कधी आले असावेत. असा अंदाज व्यक्त होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news lovers committed suicide in sinhagad