मगर महाविद्यालयात २९ मार्चला माजी विद्यार्थी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

घुले म्हणाले, "१९७१ साली स्थापन झालेल्या मगर महाविद्यालयाचे अनेक माजी विध्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त  यांच्याकडे माजी विद्यार्थी संघाची नोंदणी केली आहे.

मांजरी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील १९७१ ते २०१७ या काळातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा होणार आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी दिली.

घुले म्हणाले, "१९७१ साली स्थापन झालेल्या मगर महाविद्यालयाचे अनेक माजी विध्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त  यांच्याकडे माजी विद्यार्थी संघाची नोंदणी केली आहे. या संघाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विद्यार्थी दत्तक योजना तसेच विद्यार्थी विकास उपयोगी विधायक उपक्रम राबविले जात आहेत. पुढील काळात या उपक्रमांना गती मिळावी या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन केले आहे. १९७१ ते २०१७ या काळातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.''  

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, संघाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य अॅड. महादेव वाल्हेर, खजिनदार सुनील बनकर, सचिव प्रा. नितीन लगड, डॉ. शोभा पाटील, प्रशांत सुरसे, कृष्णकांत कोबल, मच्छिंद्र कामठे, चंद्रकांत मगर, शिरीष तळेकरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. सुनिता डाकले, प्रा. अनिल जगताप, डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. गंगाधर सातव, प्रशांत मुळे, डॉ. नाना झगडे, प्रा. संजीव पवार आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Pune news Magar college