पुण्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे बंद; जीएसटीमुळे चित्रपटगृहचालक संभ्रमावस्थेत

टीम ई सकाळ
शनिवार, 1 जुलै 2017

चित्रपटगृह चालकांच्या बैठकीत तिकिट दर आणि त्यावरील कर निश्‍चित होऊन आज दुपारनंतर चित्रपटागृहे नियमितपणे सुरू होतील, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहेत.

पुणे : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र सिनेमाच्या तिकिटदरांवर आकारण्यात येणाऱ्या कराबाबत संदिग्धता असल्याने आज (शुक्रवार) पुण्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत.

सिंगल स्क्रिन चित्रपटगृह चालक आणि प्रदर्शक (Exhibitors) यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये चित्रपटाच्या तिकिटांच्या दरांबाबत चर्चा होणार आहे. मात्र, तोपर्यंत सिनेमागृहे बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान पुण्यातील मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहे नियमितपणे सुरू असल्याचे वृत्त आहे. जीएसटीबाबतचे परिपत्रक अद्याप जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेले नाही. चित्रपटगृह चालकांच्या बैठकीत तिकिट दर आणि त्यावरील कर निश्‍चित होऊन दुपारनंतर चित्रपटागृहे नियमितपणे सुरू होतील, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

Web Title: pune news maharashtra news theater news movie news entertainment news