महेश काळे यांचे गायन ऐकण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - ‘सकाळ’ ने आयोजित केलेल्या ‘रंग दे मेहंदी’ स्पर्धेच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक महेश काळे यांचे गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रविवारी (ता. ३०) होणाऱ्या या कार्यक्रमात काळे शास्त्रीय गायनासह फ्युजन आणि हिंदी-मराठी चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत. कर्वेनगर (राजाराम पुलाजवळ) येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

‘रंग दे मेहंदी’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात काळे यांचा हा कार्यक्रम होणार आहे. ते ‘ए दिल है मुश्‍कील’ चित्रपटातील ‘दिल की तपीश’ या हिंदी गाण्यांसह ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ अशी विविध मराठी गीते सादर करणार आहेत. तसेच शास्त्रीय गायनासह ‘फ्युजन’ हे कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. 

काळे यांना अनय गाडगीळ (की-बोर्ड), प्रसाद पाध्ये (तबला), रितेश ओहोळ (इलेक्‍ट्रिक गिटार), अमित गाडगीळ (बास), अभिजित भदे (ड्रम्स) हे संगीत साथ देणार आहे. मिलिंद कुलकर्णी हे निवेदन करणार आहेत. ‘मराठे ज्वेलर्स’ हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक, तर ‘लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ हे सहप्रायोजक आहेत.

प्रवेशिका आजपासून 
कार्यक्रमाच्या प्रवेशिका मंगळवारपासून (ता. २५) मिळणार आहेत. प्रवेशिकांसाठी शंभर आणि दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात आणि ‘महालक्ष्मी लॉन्स’ येथे प्रवेशिका सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी  ९५५२११८७१० (ऋषिकेश), ९७६२४४३०४६ (सायली) आणि ८६०५८४६८३८ (किरण) या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: pune news mahesh kale