"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - "नाते तुमचे-आमचे हळूवार जपण्याचे, तिळगूळ हलव्याच्या संगे नाते अधिक दृढ करण्याचे...', "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला', अशा शब्दांत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पोषाख परिधान करून लहानग्यांसह ज्येष्ठांनीही आप्तेष्टांच्या गाठीभेटी घेत, मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छांचा स्वीकार करत मकरसंक्रांतीचा आनंद लुटला.

फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता, बच्चे कंपनी आकाशात पतंग उडविण्यात दंग होती, तर मोठ्यांनी कटुता दूर सारत एकमेकांशी प्रेमाचे अतूट बंध जोडत होते. गृहिणींची सकाळपासूनच लगबग सुरू होती. दारी रांगोळी काढून झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पूजा, दुपारी पुरणपोळीचा बेत आणि त्यानंतर सुगडी ओवसण्याच्या तयारीत त्या मग्न दिसल्या. महिलांनी मातीचे पाच कुंभ घेऊन त्यात कापूस, गव्हाच्या ओंब्या, ऊस, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, सुपारी, तीळ व पैसे घातले. ते कुंभ पाच महिलांना देण्यात आले. या शुभ मुहूर्तावर काहींनी दुचाकी-चारचाकी, इलेक्‍ट्रॉनिक वस्तुंची खरेदी केली. काही ठिकाणी पतंगोत्सवाचे आयोजन केले होते.

पोंगलही उत्साहात
दक्षिणेत महत्त्वाचा समजला जाणारा पोंगल सण शहरातही पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यासाठी मंदिरांमध्ये खास सजावट केली होती. घराघरांमध्ये नैवेद्यासाठी खास पक्वान तयार केले होते. या निमित्ताने महिलांनी नृत्य सादर केले.

Web Title: pune news makar sankranti