भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करा 

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करा 

पुणे - "सावित्रीबाई फुले यांनी जिथे स्त्री शिक्षणाचा पाया घातला, त्याच भिडे वाड्याची सध्या दुर्दशा झाली आहे. त्यामुळे भिडे वाड्याचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,' असा इशारा भिडे वाडा स्मारक समितीने गुरुवारी दिला. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीसाठी महिलांनी भिडेवाड्यासमोर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. 

या वेळी माजी आमदार कमल ढोले पाटील, मंजिरी धाडगे, सुनीता भगत, सुप्रिया ताम्हाणे, शारदा लडकत, संगीता येवलेकर, महाबळेश्‍वरचे नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, दीपक जगताप, मधुकर राऊत, सतीश गायकवाड, प्रीतेश गवळी, दशरथ कुळधरण आदी उपस्थित होते. समितीतर्फे मागण्यांचे निवेदन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आले. 

ढोले पाटील म्हणाल्या, 'आत्तापर्यंत भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करण्याकडे प्रत्येकाने सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले. मात्र या पुढे या स्मारकाबाबत गांभीर्याने निर्णय न घेतल्यास समितीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. स्मारकाला येथील दुकानदारांचा पाठिंबा आहे. काही दुकानदारांनी या आंदोलनात सहभागही नोंदविला आहे. सरकारने आता अधिक वेळ न घालविता, त्वरित राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत.' 

उज्ज्वला पिंगळे म्हणाल्या, 'राज्याच्या विविध भागांसह अन्य राज्यांत सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहे. मात्र जिथे त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.'

घाडगे म्हणाल्या, 'भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक झाले नाही, तर महिला शांत राहणार नाहीत, याची महापालिका व राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.'

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com