पुण्याचे ‘मेकअप’ अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे - ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाच्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटत अव्वल स्थान पटकावले आहे, तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ओय लेले’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

भरत नाट्य मंदिर येथे दोनदिवसीय नाट्य स्पर्धेचा समारोप नुकताच झाला. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला. ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, नागनाथ इरवाडकर, किशोर परदेशी यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी परीक्षक मेधा गोखले, भालचंद्र पानसे, दिलीप जोगळेकर, अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार, हेमंत नगरकर यांची उपस्थिती होती.

इतर पुरस्कार - दिग्दर्शन : हेमंत नगरकर (पुणे), अभिनय : अपर्णा माणकीकर (पुणे), विवेक शेळके (पुणे), नेपथ्य : राजीव पुणेकर (पुणे), प्रकाशयोजना : सुनील शिंदे (कोल्हापूर), पार्श्वसंगीत : स्वप्नील काटकर (कोल्हापूर), वेशभूषा : सुप्रिया पुंडले, रंगभूषा : शैलजा सानप, अभिनय उत्तेजनार्थ : संतोष गहेरवार (पुणे), राम चव्हाण (बारामती), प्राजक्ता घाडगे (बारामती), रेश्‍मा इंगोले (बारामती). विकास निकम यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत नगरकर यांनी आभार मानले.

Web Title: pune news makeup 1986