शिवजयंती मिरवणुकीत मुस्लीम युवकांचाही सहभाग

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 5 मार्च 2018

मंचर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता. ४) धनेश बाणखेले युवा मंच व शिवराय उत्सव समितीच्या वतीने मंचर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे नागरिकांनी उत्सफूर्तपणे स्वागत केले. अग्रभागी घोडे, उंट, झांज पथक, ढोल पथक होते. शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. मुस्लीम सामाजाचे युवकही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आमदार महेश लांडगे मित्र मंडळाचे प्रमुख कार्तिक लांडगे व भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष धनेश बाणखेले यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक कुंदन गायकवाड, दत्ता गव्हाणे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, आंबेगाव तालुकाचे भाजपचे अध्यक्ष संजय थोरात, आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, मंचर पोलीस निरीक्षक प्रकाश धस उपस्थित होते. त्यानंतर विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा व मावळ्याची वेशभूषा केलेले युवक होते. बाजारपेठ संभाजी चौक मार्गे शिवाजी चौकात मिरवणुकीचे आगमन झाले. भाजपचे सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, डॉ. ताराचंद कराळे, रवींद्र त्रिवेदी, हेमंत अभंग आदी मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत केले. हिंदू व मुस्लीम युवकांचा एकत्रित सहभाग लक्षवेधक ठरला. साहिल सय्यद, सलमान सय्यद, गुल्लू सय्यद, रिझवान इनामदार, अजहर इनामदार, अक्षय चासकर, महेश बाणखेले, अमोल जाधव, मिलिंद शिंदे, नानाभाऊ गांजाळे, सोमनाथ फल्ले यांनी मिरवणुकीची व्यवस्था पहिली.

सांगता प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक स्वप्नील महाले यांनी केले. सूत्रसंचालन अमोल महाले व अवधूत बानखेले यांनी आभार मानले.

Web Title: pune news manchar shivjayanti