अपघातातील जखमी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

यश दत्तात्रेय गावडे
यश दत्तात्रेय गावडे

मंचर (पुणे): आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील हिरकणी विद्यालयातील इयत्ता दहावीतील यश दत्तात्रेय गावडे (वय 16) या विद्यार्थ्याचे उपचारा दरम्यान निधन झाले. गेली चार दिवस त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

गेल्या आठवड्यात अवसरी-पारगाव रस्त्यावर डेरे आंब्या नजीक (वायळमळा) झालेल्या दुचाकीच्या अपघातात यश व त्याचा मित्र ऋषिकेश नारायण गावडे (वय 18) दोघेजण गंभीर जखमी झाले. ऋषिकेशचा भाऊ अक्षयचे लग्नासाठी शिवलेले कपडे मंचरला आणण्यासाठी यश व ऋषिकेश दुचाकीवरून मंचरला गेले होते. कपडे घेऊन गावडेवाडीकडे येत असताना कडबा घेऊन चाललेल्या ट्रॅक्‍टर ट्रालीला त्यांची दुचाकी धडकली. यश दुचाकी चालवत होता. त्याच्यावर पुणे येथे व ऋषिकेशवर मंचर येथे उपचार सुरू होते. यशची प्राणज्योत उपचार सुरू असताना मालवली. ऋषिकेशच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

यश हुशार विद्यार्थी होता. दहावी परीक्षेची त्याने तयारी केली होती. त्याच्या मृत्यूमुळे हिरकणी विद्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com