जमिनी रिंगरेाड मध्ये गेल्यास आम्ही बेरोजगार व्हायचे?

मांजरीखुर्द : रिंगरेाड बाधीत शेतकर्यांसाठी आयेाजीत बैठकीत माहीती देताना पीएमआरडीए चे आयुक्त किरण गित्ते.
मांजरीखुर्द : रिंगरेाड बाधीत शेतकर्यांसाठी आयेाजीत बैठकीत माहीती देताना पीएमआरडीए चे आयुक्त किरण गित्ते.

वाघोली (पुणे) प्रस्तावित रिंगरेाड साठी मांजरी, कोलवडी व आव्हाळवाडी या तीन गावातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. आमच्या बागायती जमिनी रिंगरेाड मध्ये गेल्यास आम्ही बेरोजगार व्हायचे काय? असा प्रश्न शेतकऱयांनी उपस्थीत केला. मांजरी येथील विठ्ठल मंदीरात बुधवारी (ता. 29) रिंगरेाड बाधीत शेतकर्यांची बैठक आयेाजीत करण्यात आली होती.

रिंगरेाड बाबत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यानी माहीती दिली. या रिंगरेाड मध्ये 40 छोटे मेाठे रस्ते जेाडले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार 1500 कोटी रुपये निधी देणार आहे. तर 650 कोटी रुपये राज्य सरकार व पीएमआरडीए देणार आहे. यामध्ये मुळा-मुठा नदीवरील पुलाचाही समावेश असून तो 110 मीटर रुंदीचा असणार आहे. यामुळे रिंगरेाड लगतच्या गावाचा झपाटयाने विकास होणार आहे. तीन वर्षात काम पुर्ण करण्याचे उद्दीष्ट असून रिंगरोड बाधीत शेतकर्यांना लगतच्या टाउनशिप योजनेत प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन गित्ते यानी यावेळी दिले.

दरम्यान, या रिंगरोडला शेतकऱयांनी विरोध करुन वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. या विरोधात कृती समिती स्थापन करणार असल्याचे शेतकऱयांनी सांगितले. यावेळी गित्ते यांना निवेदन देण्यात आले. या रिंगरेाड मध्ये किती जमीन बाधीत होणार याची माहितीही अधिकार्यानी दिली नाही. यामध्ये अनेक शेतकरी भुमिहीन होणार असल्याने रिंगरेाडचा मार्ग बदलावा, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या बैठकी वेळी तिन्ही गावातील शेतकरी उपस्थीत होते. डॉ. शिवदीप उंद्रे, विकास उंद्रे, प्रकाश सावंत, शिवाजी उंद्रे, वसंत उंद्रे, माउली पवळे, अशेाक आव्हाळे यानी तीव्र विरोध केला.

दोन दिवसात कृती समितीची स्थापना
दोन दिवसात रिंगरेाड विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर विरोधाची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहीती उपस्थीत शेतकऱयांनी दिली.

रिंगरेाड दृ्ष्टीक्षेपात
1) 33 किलेामीटरचा पहिला टप्पा
2) आंबेगाव खुर्द ते वाघोली असा रस्ता होणार
3) दहा पदरी रस्ता. 110 मीटर रस्त्याची रुंदी.
4) अपेक्षित खर्च 650 कोटी रुपये.
5) टोल फ्रि असणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com